खरतरं मला समोरून येताना पाहून,खुश होउन,
मला क्यूटशी स्माइल देण्यासाठी,
मला तू हवी आहे. .
तस् मी बऱ्याच मुलींशी बोलतो ,
पण फार मोजुन मापून बोलतात त्या गं .
खरतरं माझ्याशी मनसोक्त बोलण्यासाठी ,
माझ्या जोक्सवर खुदकन हसण्यासाठी,
मला तू हवी आहे..
संदीप-सलिल ला ऐकण्यासाठी मित्रांसोबत नेहमीच जातो,
पण मैत्रिणी सोबत कधी गेलोच नाही गं .
खरतरं माझ्या खान्द्यावर डोकं ठेउन ,
"आयुष्यावर बोलू काही",ऐकण्यासाठी,
मला तू हवी आहे. .
"अपाची " तशी माजी आवडती बाईक ,
पण मागची सीट नेहमीच रिकामी असती गं.
खरतरं त्याच बाईकवरून,चिम्ब भिजवणारया पावसात,
माझ्या सोबत लॉन्ग-ड्राइववर येण्यासाठी ,
मला तू हवी आहे..
शौपिंगची तशी मला फार आवड,
पण स्वत:साठी करायचा शौपिंगचा कणटाला आला गं.
खरतरं माझ्या हातात-हात घालून,लक्ष्मी रोडवर फिरून ,
माझ्यासाठी खास शर्ट घेण्यासाठी ,
मला तू हवी आहे..
"मन उधान वारयाचे" तस् मी रोजच गात असतो,
पण ऐकून कोणी गेहवरूनच येत नाही गं .
त्याच माझ्या गितावर खुश होउन ,
माझ्यासाठी वंस-मोर म्हनन्यासाठी,
मला तू हवी आहे..
क्रिकेटची तशी मला लहानपनापासूनची आवड,
पण चीरअप करायला कधी कोणी आपल आलच नाही गं .
तोच माझा सामना खास पाहान्यासाठी येउन ,
माझ्या बैटिंगवर फ़िदा होण्यासाठी,
मला तू हवी आहे..
तसा मी फोनवर नेहमीच बोलतो,
पण औपचारिक बोलूंन कणटाला आला गं .
रोज मला कॉलकरून माझ्याशी मनसोक्त बोलन्यासाठी,
मला तू हवी आहे..
दिवसा मागुन दिवस चालले आहे,
पण प्रत्येक संध्याकाळी अश्रु मात्र वाहू लागतात .
त्याच सांजवेळी माझ्यासमोर उभी राहून,
माझे अश्रु पुसन्यासाठी ,
मला तू हवी आहे.
आयुष्याचा खडतर वाटेवर एकाकी चालताना ,
अर्ध्या वाटेवरच मी खुप थकून गेलो आहे गं.
त्याच खडतर वाटेवरून माझ्यासोबत चालून ,
यशाचे शिखर गाठन्यासाठी,
मला तू हवी आहे.

Kavita avadli.
ReplyDeleteHavi asnari manatli nakki bhetel.
Dhanyawad..mazya blog la bhet dilyabaddal aani tuche comment post kelya baddal
ReplyDelete