कोरया करकरित वह्याचा सुगंध मला
शाळेत घेऊन जाणारा,तर
पावसाच्या अगोदरचा मातीचा सुगंध
मावळयाच्या संगतीत नेणारा..
आठवण म्हणजे शाळेच्या वहित
आजही जपून ठेवलेले ते पिंपळच पान
जाळी झालेल पान कधी शाळेतील
पहिल्या प्रेमाची साक्ष देत त्या
निरागस वाटेवर नेणार,
तर कधी हीच धूसर होत चाललेली
पायवाट मला क्षनोक्षणी जाणून देणारा..
आठवण म्हणजे ढगांच्या गर्दीत हरवलेल्या,विमानाच्या खिडकीतून,
बालपणी कटलेला पतंग शोधन.
पतंगासोबत मनसोक्तपणे उडन्याचा एक एक क्षण,
मात्र नकळतच डोळ्यासमोरून तरलून जाण..
आठवण म्हणजे दाटून आलेल्या संध्याकाळी,हिरव्यागार मैदानावर
उगाच एकट एकट खेळन.
सवंगड्यासॉबत चिखलात खेळलेल्या फुटबॉलच्या क्षणंना
मात्र कायमचच हरपून बसंन..
आठवण म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक पावसात
चिंब भिजत राहन.
वाहणर्या थेंबाच्या आश्रयाखाली
अश्रूनी मात्र बरसत राहन..
आठवण म्हणजे संध्याकाळ जवळ आली की,
एकट एकट राहन.
कोणाच्यातरी विरहात,
सर्व जगच परक करन..
आठवण म्हणजे सुंदर सुंदर फुलपाखरानी,
सुंदर सुंदर फुलांपासून दूर दूर जान.
कोणाच्या विरहात एवढ हिरमसून जान की,
काटेरी बाभळीलाच आपलस करन..
आठवण म्हणजे सुंदरतेची नेहमीच ओढ असणार्या
प्राजक्ताच्या फुलांनी कुरूप झाडापासून दूर दूर जान.
वेड्या झाडाने मात्र
एकत्र घालवलेला एक एक क्षण कुरुवाळत राहन..
आठवण म्हणजे भिजून आलेल्या संध्याकाळी,खळखळणार्या नदीकाठी,
किलबिलणार्या पक्षांशी हितगुज करन.
गावाकडील खुषाली कळताच,
गेहवरून आलेल्या मनाने आनंदाश्रुना वाट करून देण..
आठवण म्हणजे संदीप सलीलची गीते,
सहज,सुंदर पण नेहमीच ह्रदयाला भिडणारी.
सखीवीणा सलत जाणारे माझे विरह गीत,
जणू त्यांच्याच गीतातून गाणारे..
आठवण म्हणजे उत्तरायण,
कालच्या ईवल्या ईवल्या पावलंच्या चिमुरडीचा
नाजूक हाताचा स्पर्श आजही हवाहवासा वाटणारा,
तर बापाचा हात,हातात घेऊन चालन शिकलेल्या
चिमुरडयाचा आजचा दुरावा मन हळहळून टाकणारा..
आठवण म्हणजे चक्क आ. टी.तील कविनी(?)
शब्दांच्या पलीकडे जान.
एक एक शब्दांणा गुम्फन्याच्या प्रयत्नात,
नकळतच सहज सुंदर काव्य रचंन..
संदिप सामग

No comments:
Post a Comment