एक-एक शब्दातून तिला आठवून तरी बघाचयं .
मला एकदा सुंदर "स्वप्न" बनून पहाचयं,
ती झोपलेली असताना,तिच्या डोळ्यांत जाऊन बघाचयं.
मला एकदा सुंदर फुलांवरील "दवबिंदु" बनून पहाचयं,
श्रावनातील पावसानंतर तिच्या गालांवर जाऊन बसाचयं.
मला एकदा सोसाटयाचा "वारा" बनून पहाचयं,
गालावरचे केस आवरताना,तिला सतत पहात रहाचयं.
मला एकदा "पाऊस" बनून पहाचयं,
तीच्या विरहातील आसवे वाहून टाकत रहाचयं.
मला एकदा सुंदर "निसर्ग" बनून पहाचयं,
निसर्गचित्राच्या रुपाने का होईना,तिच्या घरात जाऊन रहाचयं.
मला एकदा ती खळखळनारी "नदी" बनून पहाचयं,
दुसऱ्यासाठी नेहमी वाहून,शेवटी सागरात विलीन व्हायचयं.
मला एकदा "फुल" बनून पहाचयं,
चुरगळनारया हातालाही सुगन्धित करून टाकाचयं.
मला एकदा "फुलपाखरू" बनून पहाचयं,
सुंदर-सुंदर फुलात राहूनही,एकट-एकट रहाचयं.
मला एकदा देवालयातील "समई" बनून पहाचयं,
स्वत: अंधारात राहूनही,देवांना मात्र उजेडात ठेवाचयं.
मला एकदा वडाच्या फांद्यावर बसलेली "कोकीळ" बनून पहाचयं,
विरहात दाटून आलेला कंठ सावरत,जिवनाचे सुंदर गीत गात रहाचयं.
मला एकदा "पाखरू" बनून पहाचयं,
उंच-उंच भरारी घेउन,क्षीतीजाच्या पलीकडेही उडाचयं.
मला एकदा "प्राजक्त" बनून पहाचयं,
खराटयाने झाडनाऱ्या प्राजक्ताच्या सडयाचे, दु:ख जाणून तरी घ्यायचयं.
शेवटी मला "मीच" बनून रहाचयं,
तिच्या विरहातही आयुष्य सुंदर बनवून टाकाचयं...
सुंदर बनवून टाकाचयं...

No comments:
Post a Comment