गोगलगाय मधे गूगल आणि गाय दोन्ही नसते पण माहिती नाही तिला गोगलगाय का म्हणतात.. गूगल कंप्यूटर वर काहीतरी खूप फास्ट असते (असे टीचर ने सांगितले होते) आणि गाय जमिनीवर मीडियम फास्ट. पण गोगलगाय खूप स्लो.. ती जाताना खाली चिक्कट फेवीकॉल सोडते म्हणून तिची बॉडी चीपकते आणि तिचा स्पीड स्लो होतो.. माझी आज्जी पण खूप स्लो चालते पण ती फेवीकॉल सोडत नाही. गाय दुध देते पण गोगलगाय फेवीकॉल देते.. गोगलगाय ला इंग्लीश मधे snail असे म्हणतात.. आमच्या क्लास च्या SNEHAL ला मी snail अस चिडवले.. तिने माझी टीचर ला कंप्लेंट केली..म्हणून मला मुली आवडत नाही..मुली खूप चालू असतात अस दादा म्हणतो.. दादा नेहमी मोबाइल ला चीपकलेला असतो अस आई म्हणते.. गोगलगायच्या पाठीवर शंख चीपकलेला असतो.. .. ती रोज शंखात झोपते (मी कधी कधी शाळेत झोपतो).. शंख फार सुंदर असते.. त्या मुळे गोगलगाय मस्त दिसते.. पॉँडस पाउडर लावल्यालर मी पण मस्त दिसतो..
गोगलगाय मला खूप आवडते ..
Anonymous
chan.
ReplyDeletetuza valvalnara manatla kida avadla.