शिरोडकर मला फार फार आवडते कारण ती फार साधी आणि शांत मुलगी आहे असे आमचे गोसावी सर म्हणतात. गोसावी सर मला खूप आवडतात कारण ते शिरोडकरला नेहमी भाव देत असतात.गोसावी सर जेव्हा शिरोडकरला भाव देत असतात त्यावेळी सुकडी आणि बीबिकर तर फार जळत असतात.जळक्या आहे साल्या त्या फार.वर्गात आपल्याला भाव देणारे फक्त राजगुरू सर आहे. राजगुरूसर आम्हाला चित्रकलेला आहे.त्यांच्या तासाला आपण एकदम फुल टू फॉर्म मधे असतो कारण मला ड्रॉयिंग मधे नेहमी अ+ ग्रेड असतात.वर्गातील खूप मुली माझ्याकडून चित्र काढून घेतात पण शिरोडकर ने माझ्याकडून कधी चित्र काढून घेतल नाही.पण माझी खूप ईचछा आहे की तिने एक दिवस माझया कडून चित्र काढून घ्याव.
”मानसी चा चित्रकार तो” हे गान मला फार आवडते कारण हे गान म्हणताना मला शिरोडकर ची खूप आठवण येते.मी घरी जेव्हा हे गान म्हणत असतो त्या वेळी आमची अंबाबाई(माझी बहीण) मला” गप्प बस पोट्त्या इवलू नको” असा म्हणून रागवते.अंबाबाई तर नेहमी हमने घर छोडा है,रसमो को तोडा है,दूर कहि जाएंगे,नई दुनिया बसाएंगे” अस काही तरी गुण गुणत असते.आमची आई तिला एकदा म्हणाली होती” तुमको जिधर जाणा है उधर जाओ लेकिन पहिले भांडे घासो…”
वर्गात बसल्यावर मी नुसता शिरोडकरला बघत बसलेलो असतो.वार्याची झूळुक आल्यावर ज्यावेळी तिचे केस तिच्या गालावर येतात त्या वेळी तर ती फार सुंदर दिसते.हसताना तिच्या गालावर पडणार्या खळीमुळे तर मला तिच्या कडे पुन्हा पुन्हा पाहवास वाटत.का कोणास ठउक पण संध्याकाळी शाळा सुटायला आली असताना मला बिलकुल करमत नाही.खूप खूप एकट एकट वाटत.सुर्या नेहमी म्हणत असतो,” जोश्या तू रोज शाळा सुटताना शांत शांत राहतो म्हणून”.संध्याकाळी मला फार रडायला येत वाटत की छानपैकी ग्राउंडवर जावे आणि फक्त मी आणि शिरोडकरन मिळून खूप खूप गप्पा माराव्या.मला शिरोडकरशी खूप खूप बोलावस वाटत पण ती समोर आली की माझ्या पोटात खूप मोठा गोळा येतो,मला खूप घाम यायला लागतो,मला काहीच सुचत नाही आणि मग काय मला तिला जे सांगायचा आहे ते नेहमी मी विसरून जातो.उद्या पासून शलेल्या सुट्ट्या लागणार आणि मग मला रोज शिरोडकर दिसणार नाही, असतील तर फक्त तिच्या आठवणी.आणि मग रोज ही संध्याकाळ गुण गुणत राहील
निशिगंधाच्या पाना वरती
तूच दिसावी पुन्हा एकदा
पुन्हा एकदा !..

No comments:
Post a Comment