Tuesday, August 2, 2011

हरवलं आहे..

परवा सहजंच बालपणीचा तो Black & White अल्बम पाहत होतो.फोटो पाहताना थोडा आनंदही झाला आणि थोडं दु:खही... It’s bittersweet. मोठया कुतुहलाने आणि प्रेमाने श्रावणातील पहिल्या सरीचा थेंब हातावर घेण्यासाठी हात पुढे करावा आणि त्याच हातावर अतिशय क्रुर आणि निर्दयीपणे वीज पडावी अगदी तशीच काहीशी माझ्या मनाची स्थिती झाली होती.त्या क्षणभंगुर परंतु अतिशय गोड अश्या आठवणी, ते आजचे ते रटाळ आणि अगोड असे हे क्षण हा प्रवास माझ्या मनात नानाविविध प्रश्न उपस्थित करत होता. मी सहजंच स्वतःवर हसत होतो आणि माझ्या मनाची समजुत काढत म्हणत होतो की, "Certainly life has changed a lot.."

डिजीकॅमच्या रंगीत दुनियेत, "कितीही फोटो काढा" असं सतत ऐकताना,कोणत्या जिवा -भावाच्या, सख्या-सवंगड्या सोबत काढावा हा प्रश्न मला भेडसावत आहे.Black & White फोटोमध्ये कधी नं पाहिलेला आणि कधी नं जाणवलेला एकटेपणा,डिजीकॅमच्या रंगी-बेरंगी दुनियेत आज मला प्रकर्षाने जाणवत आहे.डिजीकॅमच्या रंगी-बेरंगी दुनियेत फोटो रंगीत झाले आहेत मात्र जिवनातील रंगत मात्र नक्कीच फिकी झाली आहे...

ऑर्कुट,फेसबुक सारख्या सोशल(?) नेटवर्किंगच्या लाघवी दुनियेत हजारो फ्रेंड रीक्वेस्ट येतात परंतु सच्चा दोस्ताच्या हाकेत असणारी आपुलकी आणि आर्तता या बेगडी रीक्वेस्ट मध्ये कुठे आहे?एकटेपणा घालवण्यासाठी वेगवेगळ्या चाट रूम्स,कमुनिटीज जॉईन केल्या परंतु गावाकडील कट्ट्यावर बसून केलेल्या टवाळक्या आजही का जास्त जवळच्या आणि हव्याहव्याश्या वाटतात?म्हणायला माझं फ्रेंड सर्कल वाढतंय मात्र माझ्या एका हाकेत मला साद देणारा माझा सच्चा यार कुठे आहे?.खरंच सांगु, सोशल(?) नेटवर्किंगच्या या मायावी दुनियेत "सोशल टच" मात्र नक्कीच हरवला आहे...

इंटरनेट, ई-मेल,वेबकॅम या सर्वांमुळे जग जवळ आलं आहे मात्र आपली जिवाभावाची माणसे मात्र फारंच दुरावली आहे.मित्रांशी असणारा संवाद आणि संपर्क हा फक्त "Forwaded Emails" पुरताच मर्यादित झाला आहे. "Forwaded Emails" through आलेल्या वाढदिवसाच्या "ई-शुभेच्यातून " मैत्रीतील वाढत चाललेला दुरावा मात्र प्रकर्षाने जाणवत आहे. इंटरनेट, ई-मेलच्या या जंजाळात जग जवळ आलं आहे, नाती मात्र दुरावली आहे.आंतर देशीय पत्रातुन दरवळणारा नात्यातला सुगंध मात्र कुठेतरी हरवला आहे,हे नक्की...

"CUG","Unlimited Talktime",”Free SMS” यासारख्या असंख्य अश्या ऑफर्समुले प्रेमियुगालांची "चांदी" झाली आहे, हे खरं, मात्र प्रत्यक्ष भेटीत असणारी "गोडी" या ऑफर्समध्ये कुठे आहे? सुरुवातीला "Friendship is like...", नंतर त्या "गंधित गोष्टींच्या" काळात,"Love is like..." आणि मग शेवटी तो/ती "नीघून जातानाच्या" काळात,"Life is like.." अशीच काहीशी "Love Lifecycle" ("Lifecycles" म्हणणं जास्त योग्य ठरेल.) आजचे प्रेमियुगल "SMS" च्या माध्यमातून "Successfully Delivered" करतात. "जिवनाचे सार" कळल्यासारखे "Life is like..." यासारख्या "SMS" चा नुसता भडीमार होत असतो या "Love Lifecycles" च्या तिसरया स्टेजमध्ये.. सर्वात "Interesting" गोष्ट म्हणजे "SMS" च्या या "Love Lifecycles" मध्ये कोणतेच "पात्र" काल्पनिक नसतात.या "लव स्टोरीज" मध्ये "पात्रे"(SMS मधील नावे ) सतत बदलतात, मात्र "कथा" (SMS मधील मजकूर) तोच राहतो. ऋणानुबंधाच्या या नात्यात भेटीत असणारी तृष्टता मात्र कुठेतरी हरवली आहे. हे नक्की...

का कुणास ठाऊक आज घर,नोकर,नोकरी,पैसा सर्व काही असताना काहीतरी हरवल्या सारखं वाटतं.का कुणास ठाऊक आज गर्दीत असतानाही एकट-एकट वाटतं.. आज कळलंय मला की, मी सुद्धा "3G" च्या मायावी गर्दीत हरवलो आहे आणि.. गर्दीचे काही नियम नसतात...समोरचा चालतोय म्हणून मागचे चालतात आणि आपल्या मागे खूप "गर्दी" आहे म्हणून समोरचा चालत असतो. इंटरनेटच्या या "ई-दुनियेत" का मी पुन्हा-पुन्हा शोधत आहे "गर्दीत हरवलेला मी"..?

गावाकडे गेल्यावर मित्र म्हणतात,दोस्ता खुप शिकलास,मोठा झालास.मला विचारतात शहराच्या या "ई-दुनियेत",गावाकडील काय-काय miss करतो? मी मात्र स्वतःवरच हसतो आणि विचार करतो की, "Certainly, Life was much simpler & beautiful when Apple & Blackberry were just fruits."

Wednesday, June 1, 2011

मी फसलो म्हणूनी...

One of my favourite poem by Sandeep Khare...Here is what Sandeep(I mean Sandeep Khare.. ) want to tell about his poem..

संदीप : या कवितेविषयी आधी थोडंसं सांगतो...की हातामधून हात सुटून जातो, पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता -

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

Monday, May 2, 2011

अशाच एका संध्याकाळी

अशाच एका संध्याकाळी
बुडून जावे त्या वाटांनी
रंग असावा तो स्वप्नांचा
हळुवार,गोजिऱ्या प्रितीचा

अशाच एका संध्याकाळी
अविरत असावा तो क्षण
क्षण असावा तो स्पर्शाचा
हळुवार,लाजऱ्या लाजाळूचा.

अशाच एका संध्याकाळी
ऋतू असावा तो झरणारा
चिंब भिजावे दोन जिवांनी
आसुसलेल्या त्या डोळ्यांनी

अशाच एका संध्याकाळी
हरवून जावे त्या वाटेवर
आस नको ती परतीची
वेल्हाळ,जुजबी दुनियेची

अशाच एका संध्याकाळी
संगत हवी फक्त तुझी
असो दुरावा दुजांचा
परी साथ असावी फक्त माझी

अशाच एका संध्याकाळी
बांध फुटावा तो विरहाचा
विरून जावे त्या श्वासांनी
निशब्द तुझ्या त्या आठवणींनी
निशब्द तुझ्या त्या आठवणींनी...

संदिप सामग

Thursday, November 25, 2010

आठवणीतले दिवस

म्हणतात ना नाते असते बालपणीच्या सवंगड्याच्या निरागस मैत्रीचे,नाते असते त्या दोन डोळ्यांचे आयुष्यभराच्या विरहातही एकत्र राहण्याचे,त्या पानांचं अन् वेलींच,त्या शंखाचं अन् शिंप्ल्याचं,त्या चंद्राचं अन् ताऱ्याच,त्या फुलांचं अन् फुलपाखराचं. तसेच माझेही नाते आहे आयुष्यभर माझ्या समवेत चालणाऱ्या माझ्या "आठवाणीचे". यात जपून ठेवलेय मी "आठवणीतले बालपण".

खरेचं आयुष्यातील काही क्षण फारचं सुंदर असतात. मी तर म्हणेन काही सुंदर क्षणांमुळेच आयुष्य सुंदर होऊन जाते.शाळेच्या वहीत जाळी झालेले पिंपळाच पान जपून ठेवावे तसे काही क्षण आयुष्याच्या ह्रदयरूपी वहीत कायमचेच कोरलेले असतात. आपल्या नकळतच हे क्षण अलगदपणे मनाच्या एका कोपऱ्यात विसावतात आणि मग तयार होतो एक सुंदरसा,नाजूकसा "आठवणींचा धागा". जशी श्रावणातल्या संध्याकाळी एक हळुवार पावसाची सर मनाला चिंब भिजवून जावी अगदी तसेच हा धागा संध्याकाळ जवळ आली की मनाला चिंब भिजवून जातो.फरक फक्त एवढाच की पाऊस थेंबानी भिजवतो तर हा धागा आसवांनी...

आयुष्याच्या पाऊल वाटेवर कधी थांबलो तर कधी चाललो.जगण्याच्या या वाटेवर कधी ठेच लागून पडलो,तर कधी पडता पडता सावरलो.आयुष्याच्या या खडतर वाटेवर,एक नवीन अतिशय सुंदर नाते जोडत गेलो.नाते माझे आणि त्या हळुवार क्षणांचे,जे व्यक्त करताना आज मला जाणवते की शब्द किती तोकडे आणि पोकळ असतात ना? शब्द हे त्या पाण्याच्या बुडबुड्या प्रमाणे असतात, त्यांना काहीच अर्थ नसतो… त्यामागे असणाऱ्या भावनाच त्यांना सहज,सुंदर बनवतात. माझे आणि या हळुवार क्षणाचे नाते म्हणजे "आठवण"... एक एक फुल गुम्फुन जसा नाजूक, सुंदर सा गजरा माळावा अगदी तसाच एक एक हळुवार क्षण आठवणीच्या धाग्यात गुम्फुन मी "आठवणीचा गजरा" माळला आहे.

आयुष्यात काही क्षण कोणत्यातरी कारणांमुळे आले,तर काही कोणत्यातरी ऋतुसाठी आले पण फार मोजकेच क्षण आहे जे कोणत्याही कारणांवीणा आले आणि सदाबहार फुलांप्रमाणे कायमचेच मनात स्थिरावुन गेले. आठवणीच्या या नात्यात मी रोज बघतो ते निरागस बालपण. आजही डोळ्यासमोरून तरळुन जातात ते खेळण्याचे,बागडण्याचे,फुलण्याचे आणि बालपणीच्या सवंगड्याच्या निस्वार्थ मैत्रीचे निरागस क्षण. आजही कोऱ्या कोऱ्या करकरीत वह्यांचा सुगंध मला माझ्या शाळेत घेऊन जातो तर पावसाच्या अगोदरचा मातीचा सुगंध माझ्या मावळ्यांच्या संगतीत...मला अगदी स्पष्टपने आठवत आहे मला मोठे मोठे स्वप्न पाहावयास शिकवणारा,उंच उंच भराऱ्या घेणारा तो रंगीत पतंग...," हा पतंग की पाखरू,म्हणे मज आकाशी चल उडु..." हे गाताना जणु मला गगन भरारी शिकवणारा. मला आजही आठवतो तो माझा ठरलेला बेंच.शाळेच्या ग्राउंड वरील ते सकाळचे कोवळे,सोनेरी ऊन आजही मला वर्गाबाहेर फुटबॉल खेळण्यास बोलावतात.आजही मी आतुरतेने वाट बघत आहे मधल्या सुट्टीची,मित्राचा डबा मी खाण्याची आणि माझा डबा मित्राने खाण्याची.आजही मला आठवतो तो मराठीचा तास ज्याला सरांनी कुसुमाग्रजांची "कणा" हि कविता शिकवली होती. आजही त्या कवितेच्या ओळी नकळतच ओठांवर येतात...

ओळखलत का सर मला !
पावसात आला कोणी ?
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
.
.
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठी वरती हाथ ठेऊन नुसते लढ म्हणा !
नुसते लढ म्हणा ...

खरेचं आजही मला वाटत की, मी जे काही करत आहे ते करताना माझे सर मला बघत आहे आणि सरांचं नुसतं लढ म्हणन ही भावनाच फार स्पुर्तीदायी आहे.

आजही मला आठवते ती गावाकडील अविश्वशनीय सकाळ,ते किलबिलनारे पक्षी,ती खळखळनारी नदी,ती बाबांनी रेडिओवर लावलेली भावगीते.आजही आईच्या अंगाई गीतांचे स्वर माझ्या कानात गुणगुणत आहे.आजही वाटते की ताईशी मनसोक्तपणे भांडावे,तीची मुद्दामच खोड काढावी.Match fixing ने बरबटलेल्या क्रिकेटच्या लाघवी दुनियेत दादासोबतच खेळलेलं क्रिकेटच जास्त प्रामाणिक आणि आनंदायी वाटते. वाटते की नकोच ते T.V. समोर बसून तासन तास वाया घालवणे,त्या पेक्षा आपल्या मागच्या अंगणात दादासोबातच मनसोक्तपणे परत एकदा खरा "Gentlemens Game" खेळावा.

आयुष्यातील काही क्षण असे असतात की,वाटते की ते कधीच संपू नये...पण क्षणांचे हे असेच असते,नेमके आपण या क्षणांना गोंजारणार की तोच हे क्षण संपलेले असतात.गेलेला क्षण मात्र आपली "आठवण" मनावर कायमचीच कोरून जातो, जशी फुलपाखरे हातांवर रंग ठेऊन उडून जातात.कोणत्या व्यक्तीचं किंवा क्षणांचं आपल्या आयुष्यात येणे किंवा जाणे नक्कीच आपल्या हातात नाहीये पण आहे ते क्षण अजून सुंदर बनवणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.यावर पाडगावकरांची एक सुंदरशी कविता आठवते...

अपुल्या हाती नसते काही, हे समजावे
कुणी दिले जर हात आपुले, हाती घ्यावे

नकोच मनधरणी अर्थाची नको आर्जवे
शब्दांनी जर मिठी घातली, गाणे गावे

भिरभिरणा-या फूलपाखरा नसेन आशा
विसावले जर, ओंजळीचे तर फूल करावे

आज माझ्या ओंजळीत साठल्या खूप साऱ्या "आठवणी"...आणि त्या वेचण्याचा केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न....

संदिप सामग

Thursday, June 3, 2010

Adieu & All The Best(My last working day @ Syntel)

“You look happy today!” my friend said me in the morning.

“Really?” I was quite happy but I know ,I won't when it will come till the end of the day.

Frankly speaking, I have been dreaming of this day for years and now that it’s here .it’s bittersweet. Still I don’t believe that from tomorrow I won’t be part of Syntel. I take this opportunity to thank each one of you for offering me your awesome Support, valuable Guidance and the finest Companionship, possible during my tenure in Syntel.

Yesterday night when I thought tomorrow will be my last day in Syntel, I just went in silence. I don’t have any words to express my feeling. I just went in flashback….My first day in Syntel. It was my first step in this corporate world and I was quite nervous at that time but you know time has just passed away...!!! .Still I don’t remember the day when I forgot my all nervousness and become an important member of this Syntel Family. I don’t know how it happened but each day I found myself getting more and more attached to my work and Syntel. There was a growing feeling of “My Company”. I still remember my doctor friend asking me “What does Syntel do” to you guys that you feel so strongly about It.? Working at Syntel was very enriching and rewarding experience.

My school teacher used to tell me that “God is more truly imagined than expressed, and He exists more truly than He is imagined.” Today after lots of year I come to know the true meaning of this sentence, I realized the huge gap between Emotions and Words. You know, you can’t expressed every feelings with words...they are too small to express. Sometimes I feel words are just like water bubbles, they do not have meaning...the emotion inside them makes them beautiful.... They are not as strong as the silent actions...You know I know how desperately I am going to miss Syntel but I can’t express it.

Life@Syntel... Hmmmm…I am sorry it’s printing mistake. It’s Celebration@Syntel and you know why? Because Life when stretched becomes celebration...It was never boring routine work for me. I celebrated each and every moment with Syntel. Syntel made me wait, Syntel made me to go mad with anger sometimes, Syntel made me feel happiest, Syntel made me feel inspired, Syntel made me feel agitated, Syntel made me feel frustrated, Syntel made me to lose my temper .

Why can’t we get all the people together in the world that we really like and then just stay together? I guess that wouldn’t works. Someone would leave. Someone always leaves. Then we would have to say good-bye. I hate good-byes. I know what I need .I need more hellos. Goodbye isn’t painful unless you’re never going to say hello again and I am pretty much sure that in this small world somewhere, sometime, someplace you are going to say me hello again. Certainly how lucky I am to have someone who are so hard to say goodbye to.

Today I just want to ask God that why are the words like goodbye, I am sorry and I love you, so easily pronounced but so hard to say.

Finally friends this is small world and if we destined to meet, let our destiny decide on that…Till then, GOOD BYE…

Sandip Samag

Wednesday, May 26, 2010

काय असते आठवण

आठवण म्हणजे दरवळणारा सुगंध
कोरया करकरित वह्याचा सुगंध मला
शाळेत घेऊन जाणारा,तर
पावसाच्या अगोदरचा मातीचा सुगंध
मावळयाच्या संगतीत नेणारा..

आठवण म्हणजे शाळेच्या वहित
आजही जपून ठेवलेले ते पिंपळच पान
जाळी झालेल पान कधी शाळेतील
पहिल्या प्रेमाची साक्ष देत त्या
निरागस वाटेवर नेणार,
तर कधी हीच धूसर होत चाललेली
पायवाट मला क्षनोक्षणी जाणून देणारा..

आठवण म्हणजे ढगांच्या गर्दीत हरवलेल्या,विमानाच्या खिडकीतून,
बालपणी कटलेला पतंग शोधन.
पतंगासोबत मनसोक्तपणे उडन्याचा एक एक क्षण,
मात्र नकळतच डोळ्यासमोरून तरलून जाण..

आठवण म्हणजे दाटून आलेल्या संध्याकाळी,हिरव्यागार मैदानावर
उगाच एकट एकट खेळन.
सवंगड्यासॉबत चिखलात खेळलेल्या फुटबॉलच्या क्षणंना
मात्र कायमचच हरपून बसंन..

आठवण म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक पावसात
चिंब भिजत राहन.
वाहणर्‍या थेंबाच्या आश्रयाखाली
अश्रूनी मात्र बरसत राहन..

आठवण म्हणजे संध्याकाळ जवळ आली की,
एकट एकट राहन.
कोणाच्यातरी विरहात,
सर्व जगच परक करन..

आठवण म्हणजे सुंदर सुंदर फुलपाखरानी,
सुंदर सुंदर फुलांपासून दूर दूर जान.
कोणाच्या विरहात एवढ हिरमसून जान की,
काटेरी बाभळीलाच आपलस करन..

आठवण म्हणजे सुंदरतेची नेहमीच ओढ असणार्‍या
प्राजक्ताच्या फुलांनी कुरूप झाडापासून दूर दूर जान.
वेड्या झाडाने मात्र
एकत्र घालवलेला एक एक क्षण कुरुवाळत राहन..

आठवण म्हणजे भिजून आलेल्या संध्याकाळी,खळखळणार्‍या नदीकाठी,
किलबिलणार्‍या पक्षांशी हितगुज करन.
गावाकडील खुषाली कळताच,
गेहवरून आलेल्या मनाने आनंदाश्रुना वाट करून देण..

आठवण म्हणजे संदीप सलीलची गीते,
सहज,सुंदर पण नेहमीच ह्रदयाला भिडणारी.
सखीवीणा सलत जाणारे माझे विरह गीत,
जणू त्यांच्याच गीतातून गाणारे..

आठवण म्हणजे उत्तरायण,
कालच्या ईवल्या ईवल्या पावलंच्या चिमुरडीचा
नाजूक हाताचा स्पर्श आजही हवाहवासा वाटणारा,
तर बापाचा हात,हातात घेऊन चालन शिकलेल्या
चिमुरडयाचा आजचा दुरावा मन हळहळून टाकणारा..

आठवण म्हणजे चक्क आ. टी.तील कविनी(?)
शब्दांच्या पलीकडे जान.
एक एक शब्दांणा गुम्फन्याच्या प्रयत्नात,
नकळतच सहज सुंदर काव्य रचंन..


संदिप सामग

Sunday, May 23, 2010

I am someone...

"Sandy, you are wrong person in wrong field” one of my friend used to say me this so often. Is it so? I am wrong person? Certainly I am not a wrong person but maybe I am among wrong people, what you people called it “We are professional”. After coming into this “Glamorous Software Industry”, I heard this word everyday and now I got scared of this word. Frankly speaking I am not a professional but I am working in the professional field.

You know I am someone who always wanted to enjoy my life with its all different shades and colors. I always believe that God has made this life full of different shades and colors, so that we shouldn’t get bored just by trying only one shade and color. You know life is like rainbow and it will be beautiful only when all of its seven colors will come together and stays forever. I want to make my life like this rainbow...Simply beautiful…I want to live not to just exist.

I celebrated all my childhood in small town and may be because of that, I am bit simple and very much emotional person. So it’s always tough for me to cope up with this fast paced life. You know I don’t want to run in this heart beating race just because everybody is running, rather I just want to stop a while and want to see how this beautiful life moves on. I always feel that, I am very much lucky about my childhood. I met with lot of nice people who were very much loving and caring. I grow up by playing lot of cricket with my elder brother (maza dada) and you know today I reached here only because of him. He is my mentor and in my childhood, he was my competitor when we used to play cricket on small ground present just in front our home and you know I always used to beat him...

I am from middle class family from small town. I still remember “Yega yega hamma gayi... (Angayi geet”), my mother used to sing when I was going to sleep. My mother is very good singer and because of her only I learned Tabla.My friend always asks me from where you get all these old Marathi songs and you know answer is… from my mother. I am software engineer by profession but musician by heart and for this all credit goes to my mother. I am not very good singer but I sing every song straight from the heart that really makes me very happy and pleasant. Music has played crucial role in grooming my personality. It’s has been one of my source of inspiration. I often forgot myself and enjoy that wonderful world which I am not ready to share with others (Am I too selfish?).I always wanted to have life filled with music rather musical life is what I always expected. I still have that incredible morning in my memory which I enjoyed at my native place. I still remember that that sweet songs of birds and gurgling sound of wonderful river. I still remember, early in the morning when my dad used to play Marathi bhavgeet on radio. I have always longed for and still long for but this city life has never presented me with an “Aathwantitali Sakal”.

I played lot of cricket in my childhood rather I grow up with cricket only. Cricket has been never a mere play game for me, it’s been my source of inspiration. I used to learn lot of things while playing cricket. Cricket taught me that life is team game .To survives in life, you’ve got to back each other, you’ve got to help each other, and it’s like give and take. Like cricket,there is so much uncertainty in life; it taught me to accept both success and failure equally. Every hour I spent on field changed my attitude towards life. It made me immensely competitive.Cricket is a way of life for me and I am sure too for thousands of others too in this country who follow game passionately.

I strongly believe that definition of joy differs from person to person and I think that one thing may be great joy for someone but at the same time it may be so much boring for someone…My joy lies in Tabla, Music, Writing(I hope you are not getting bored?), and Reading.I want to enjoy my life in my own way. Someone has greatly said that “Life is a journey” and you know to accomplish this journey, I want to create my own path, my Dream path. The path that my heart always wished to follow.

Sandip Samag