डिजीकॅमच्या रंगीत दुनियेत, "कितीही फोटो काढा" असं सतत ऐकताना,कोणत्या जिवा -भावाच्या, सख्या-सवंगड्या सोबत काढावा हा प्रश्न मला भेडसावत आहे.Black & White फोटोमध्ये कधी नं पाहिलेला आणि कधी नं जाणवलेला एकटेपणा,डिजीकॅमच्या रंगी-बेरंगी दुनियेत आज मला प्रकर्षाने जाणवत आहे.डिजीकॅमच्या रंगी-बेरंगी दुनियेत फोटो रंगीत झाले आहेत मात्र जिवनातील रंगत मात्र नक्कीच फिकी झाली आहे...
ऑर्कुट,फेसबुक सारख्या सोशल(?) नेटवर्किंगच्या लाघवी दुनियेत हजारो फ्रेंड रीक्वेस्ट येतात परंतु सच्चा दोस्ताच्या हाकेत असणारी आपुलकी आणि आर्तता या बेगडी रीक्वेस्ट मध्ये कुठे आहे?एकटेपणा घालवण्यासाठी वेगवेगळ्या चाट रूम्स,कमुनिटीज जॉईन केल्या परंतु गावाकडील कट्ट्यावर बसून केलेल्या टवाळक्या आजही का जास्त जवळच्या आणि हव्याहव्याश्या वाटतात?म्हणायला माझं फ्रेंड सर्कल वाढतंय मात्र माझ्या एका हाकेत मला साद देणारा माझा सच्चा यार कुठे आहे?.खरंच सांगु, सोशल(?) नेटवर्किंगच्या या मायावी दुनियेत "सोशल टच" मात्र नक्कीच हरवला आहे...
इंटरनेट, ई-मेल,वेबकॅम या सर्वांमुळे जग जवळ आलं आहे मात्र आपली जिवाभावाची माणसे मात्र फारंच दुरावली आहे.मित्रांशी असणारा संवाद आणि संपर्क हा फक्त "Forwaded Emails" पुरताच मर्यादित झाला आहे. "Forwaded Emails" through आलेल्या वाढदिवसाच्या "ई-शुभेच्यातून " मैत्रीतील वाढत चाललेला दुरावा मात्र प्रकर्षाने जाणवत आहे. इंटरनेट, ई-मेलच्या या जंजाळात जग जवळ आलं आहे, नाती मात्र दुरावली आहे.आंतर देशीय पत्रातुन दरवळणारा नात्यातला सुगंध मात्र कुठेतरी हरवला आहे,हे नक्की...
"CUG","Unlimited Talktime",”Free SMS” यासारख्या असंख्य अश्या ऑफर्समुले प्रेमियुगालांची "चांदी" झाली आहे, हे खरं, मात्र प्रत्यक्ष भेटीत असणारी "गोडी" या ऑफर्समध्ये कुठे आहे? सुरुवातीला "Friendship is like...", नंतर त्या "गंधित गोष्टींच्या" काळात,"Love is like..." आणि मग शेवटी तो/ती "नीघून जातानाच्या" काळात,"Life is like.." अशीच काहीशी "Love Lifecycle" ("Lifecycles" म्हणणं जास्त योग्य ठरेल.) आजचे प्रेमियुगल "SMS" च्या माध्यमातून "Successfully Delivered" करतात. "जिवनाचे सार" कळल्यासारखे "Life is like..." यासारख्या "SMS" चा नुसता भडीमार होत असतो या "Love Lifecycles" च्या तिसरया स्टेजमध्ये.. सर्वात "Interesting" गोष्ट म्हणजे "SMS" च्या या "Love Lifecycles" मध्ये कोणतेच "पात्र" काल्पनिक नसतात.या "लव स्टोरीज" मध्ये "पात्रे"(SMS मधील नावे ) सतत बदलतात, मात्र "कथा" (SMS मधील मजकूर) तोच राहतो. ऋणानुबंधाच्या या नात्यात भेटीत असणारी तृष्टता मात्र कुठेतरी हरवली आहे. हे नक्की...
का कुणास ठाऊक आज घर,नोकर,नोकरी,पैसा सर्व काही असताना काहीतरी हरवल्या सारखं वाटतं.का कुणास ठाऊक आज गर्दीत असतानाही एकट-एकट वाटतं.. आज कळलंय मला की, मी सुद्धा "3G" च्या मायावी गर्दीत हरवलो आहे आणि.. गर्दीचे काही नियम नसतात...समोरचा चालतोय म्हणून मागचे चालतात आणि आपल्या मागे खूप "गर्दी" आहे म्हणून समोरचा चालत असतो. इंटरनेटच्या या "ई-दुनियेत" का मी पुन्हा-पुन्हा शोधत आहे "गर्दीत हरवलेला मी"..?
गावाकडे गेल्यावर मित्र म्हणतात,दोस्ता खुप शिकलास,मोठा झालास.मला विचारतात शहराच्या या "ई-दुनियेत",गावाकडील काय-काय miss करतो? मी मात्र स्वतःवरच हसतो आणि विचार करतो की, "Certainly, Life was much simpler & beautiful when Apple & Blackberry were just fruits."

No comments:
Post a Comment